
एस आय पी म्हणजे , सिस्टीमॅटीक इंव्हेस्टमेंन्ट प्लॅन .... सिस्टीमॅटीक या शब्दाचा अर्थच नियोजनबध्द असा आहे . योग्य पध्दतीची योजना आणि व्यवस्थापन असलेली गुंतवणुक म्हणजे एस आय पी . बचत असो , गुंतवणूक असो वा मग अगदी कमाई , पण गुंतवणूक करण्यासाठी हवा अधिकचा पैसा आणि वेळही ...
ब-याचदा धावपळीच्या जगात आपण पैसा कमवतो पण तो कुठे आणि कसा गुंतवावा या साठी आपल्याजवळ वेळ आणि योग्य मार्गदर्शनही नसतं .. यात तुमचा काही दोष ही नाही ... पण या परिस्थितीत तुम्ही नक्कीच एसआयपीचा विचार करू शकता ....
एसआयपीचा पैसा मुख्यत: म्युचअल फंडात गुंतवणूक केला जातो . तुम्ही ही गुंतवणूक अगदी ५०० रुपया पासुन सुरू करू शकता ... आणि ती केली जाते दर महिन्याला कींवा दर तीन महिन्याला .... याचे अनेक फायदे ही आहेत .....
मुख्य म्हणजे गुंतवणूक करण्याचा कठिण मार्ग तुमच्या साठी एसआयपी सहज आणि सोपा करते . अगदी तुमची मासिक किंवा त्रैमासिक गुंतवणूक सरळ तुमच्या बचत खात्यातून , पोस्ट डेटेड चेक किंवा इसीएस म्हणजे इलेक्ट्रोनिक क्लिअरिंग सिस्टीम ने वर्ग केली जाऊ शकते . थेबे थेबे तळे साचे या म्हणी नुसार या माध्यमातून एक मोठी रक्कम उभारण तुम्हाला शक्य होतं .
काही म्युचुअल फंड बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात पण अशा वेळा गुंतवणूक करणं मानसिक दृष्टया सहज सोपं नसतं . हा मार्ग फायद्याचा असु शकतो मात्र एसआयपीचा मुळ हेतू यातुन साध्य होतं नाही . एसआयपी मुख्यत: तुम्हाला नियमितपणे बचत आणि गुंतवणूक करायची सवय लावते .
काळजी घेण्याच्या गोष्टी ...
एसआयपी आपल्याला मर्यादीत काळात पॉजेटीव्ही रिटर्न देईलच असं नाही . कारण जर आपण मंदीच्या काळात गुंतवणूक केली असेल आणि शेअस बाजारात मंदीनं उद्याच्या काळात आणखी मंदी आली तर आपल्याला तोटा ही सहन करावा लागू शकतो ...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें