रविवार, 13 जुलाई 2008

नेत्याना जोड़े मारा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांविरोधात सुरु केलेलं जोडे मारा आंदोलन अजुनही शांत होण्याची चिन्ह नाहीएत. पुण्यातुन सुरु झालेल्या या वादाचे पडसाद आता राज्यभर पडताना दिसतायत. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशहा एकमेकांच्या डोक्यात बाटल्या मारल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही अजित पवाराच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम पार पाडला. हा प्रकार एवढा चिघळला की दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले आणि परिसरात तनाव निर्माण झाला. या परिसरात उभ्या असलेल्या सामान्य नागरिकांच्या गाड्यांना आणि दुकानांनाही याचा फटका सहन करावा लागला. काही गाड्यांच्या काचा फुटल्या तर काही दुकानांना शटरडाऊन करावं लागलं. भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली.

कोई टिप्पणी नहीं: