रविवार, 13 जुलाई 2008

चूल बंद आंदोलन

लातूर जिल्ह्यातील पाणचिंचोली गावात सध्या चूल बंद आंदोलन सुरु केलं आहे. या गावातल्या शाळेच्या समितीवर ग्रामस्थांचा समावेश करावा या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून सात ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आता पाच हजार लोकसंख्येच्या या गावाने चूल बंद आंदोलन करण्याचे ठरवले आहे. तसेच गावातील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती. या गावात 1959 साली लोकमान्य माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या शाळेत बाहेरगावची मुलं देखील शिकायला येतात. या संस्थेच्या वाढत्या पसा-यावर लक्ष ठेवण्यासाठी गावातील ज्ञानोबा जाधव यांची अध्यक्षपदी तर मधुकर पाटील यांची सचिवपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी शाळेचा सर्व कारभार आपल्या हाती घेत गावक-यांना शाळेच्या कारभारातून बेदखल केलं. तसेच हे दोघे शाळेत कोणतीही सुधारणा देखील करत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा समावेश करावा यामागणीसाठी उपोषण करणा-या गावक-यांच्या पाठिंब्यासाठी अख्ख्या गावानेच चूल बंद आंदोलन करण्याची अनोखं पाऊल उचलंलं आहे.

कोई टिप्पणी नहीं: