रविवार, 13 जुलाई 2008

नक्शाली नासधुस

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील छत्तीसगड आणि महाराष्ट्रातल्या सीमेलगतच्या सावरगाव इथे पंचवीस जुन रोजी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जिल्हापरिषद शाळेची नासधुस केली. या परिसरातील नक्षलवादी संघटनांनी सव्वीस जुन पासून भारत बंद पाळला आहे. या बंदच्या पहिल्या दिवशीच नक्षलवाद्यांनी शाळेची नासधुस केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शाळेच्या आवारात पाच इमारती असून त्यातली एकही शाबूत राहिलेली नाही. तसेच शाळेच्या इमारतीतील शैक्षणिक साहित्य जाळण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेचा वापर हा केवळ ज्ञानदानासाठी करावा, त्याचा वापर पोलिसांना करु न देण्याचा इशाराही नक्षलवाद्यांनी दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं: