रविवार, 13 जुलाई 2008

शेतकरी हवालदिल

राज्यात खतं आणि बियाणांच्या टंचाईने त्रस्त झालेला शेतकरी मान्सूनने दडी मारल्यामुळे पुरता हवालदिल झाला आहे. पेरणीवर याचे विपरीत परिणाम झाले आहेत. राज्य सरकारला सद्य परिस्थीतीची नोद घेणं भाग पडलं आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ५.७ लाख हेक्टर्सवर खरीपाची पेरणी झाली असून ती एकुण खरीपाखालील क्षेत्राच्या फक्त

दहा टक्के आहे. आणि उस पीका खालील क्षेत्र यातनं वगळलं तर ती फक्त चार टक्के आहे.
राज्यातील एकुण खरीपाखालील क्षेत्र आहे १३४.२ लाख हेक्टर्स. आता पर्यंत उस पीकासहित फक्त १३.४ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. याचा अर्थ फक्त १० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. मराठवाड्यात तर एक टक्के क्षेत्रावरही पेरणी होऊ शकलेली नाही. मराठवाड्यात खरीपाखालील क्षेत्र आहे ३९ लाख हेक्टर्स त्यापैकी फक्त २ लाख हेक्टर्सवरच पेरणी झाली आहे. यात तोडणीला आलेल्या उस पीका खालचं क्षेत्र आहे १.९ लाख हेक्टर्स.

बुधवारी झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यातील २०४ तालुक्यात पाऊसच पडला नाहीये तर ९९ तालुक्यात फारच थोडा पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६० एमएम पाऊस कमी पडला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याचा साठा फक्त १६ टक्के आहे. कृषी खात्याचे संचालक प्रभाकर देशमुख यांच्या मते पेरणीचा सुरवात १५ जुनपासून होते. शेतक-यांनी शेतं पेरणीसाठी तयार करुन ठेवली पण पावसाने दडी मारल्यामुळे हातातवर हात धरुन बसण्याव्यतिरिकत बळीराजा काही करु शकत नाही अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात एकुण सरासरी पेक्षा ५१ टक्के पाऊस कमी झाला आहे. कोकण आणि दक्षिणेतील काही भाग वगळता जुन १४ पासून मान्सूनने द़डी मारली आहे. त्यामुळे शेतक-यांना आता प्रार्थना दयाघना करण्याची वेळ आहे.

कोई टिप्पणी नहीं: