रविवार, 13 जुलाई 2008

गरजू शेतकऱ्यांना नाडणाऱ्या सावकारांविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यात एक नवं आंदोलन उभं राहिलयं. जमिनी हडप करणाऱ्या सावकारांकडून शेतकरी स्वतःच्या जमिनी परत घेऊ लागले आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातल्या बावीस शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. आणि त्यामुळेच जिल्ह्यात शेतकरी-सावकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. रिपोर्ट...
दुष्काळी स्थिती, अत्यल्प शेतजमीन आणि कमी उत्पन्न यातून निर्माण होणारी आर्थिक चणचण शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यामुळं गरजेवेळी सहकारी संस्थाही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात असमर्थता दर्शवितात. आणि नेमक्या त्याच परिस्थितीचा गैरफायदा ग्रामीण भागातली सावकारी मंडळी घेताना दिसतात. पुढे हेच सावकार ग्रामीण भागात निर्माण करतात एक समांतर अर्थव्यवस्था. आणि जिचा हेतू असतो केवळ लुबाडणूक. अशाचं सावकारांविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यात सध्या एक आंदोलन सुरु झालयं.
गरजू शेतकऱ्यांना नाडणाऱया आणि त्यांची जमीन हडपणाऱ्या सावकारांकडील जमीनी परत घेण्यासाठी इथल्या शेतकऱयांनी हे आंदोलन सुरु केलयं. या आंदोलनातून जिल्ह्यातल्या सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी सावकारांकडून परत घेण्यात यश मिळवलयं. आणखी पुढेही हे आंदोलन सुरुचं ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निश्चय आहे. मात्र, सावकार मंडळी स्थानिक गुंडांच्या मदतीने हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करता आहेत. यातूनचं अनेक शेतकऱ्यांवर हल्लेही होत आहेत.
अशा सावकारी प्रवृत्तींशी लढण्यासाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गरज आहे आता पोलिसांच्या मदतीची. पोलिसांची मदत मिळाल्यास सावकारांविरुद्धचं हे आंदोलन यापुढेही सुरुचं ठेवण्याचा इथल्या शेतकऱ्यांचा निश्चय आहे.

कोई टिप्पणी नहीं: